बनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख

प्रमोद बोडके 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा विश्‍वास सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी इच्छुकांचे सोलापूर दौरे वाढले आहेत.

माजीमंत्री सुशीलकुमार शिंदेही गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात सक्रिय झाले आहेत. भाजपची उमेदवारी आपल्याला मिळेल यासाठी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून मतदार संघाचे दौरे वाढविले आहेत. खासदार साबळे यांच्याबाबत पालकमंत्री देशमुख यांची भूमिका स्पष्ट नसल्याने संभ्रमाचे वातावरण होते. पालकमंत्री देशमुख यांनी 2019 साठी आपले वजन खासदार बनसोडे यांच्या पारड्यात टाकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 2014 मध्ये आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद सभापती विजयराज डोंगरे आमच्यासोबत नव्हते. आता त्यांच्यासह इतर नवीन समविचारी ग्रुपही आमच्या सोबत असल्याने खासदार बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एमआयएम व भारीपचाही उमेदवार या निवडणूकीत राहिल्यास आमच्यासाठी फायद्याचेच ठरेल. कोण खासदार साबळे, त्यांना अधिकार? अशी विचारणाही पालकमंत्री देशमुख यांनी केली आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सहकारमंत्री देशमुख यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. सोलापूरला मिळालेल्या योजना व निधीची माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितली. यातील बहुतांश प्रकल्प व योजना आपण आणले असल्याचेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

शिंदे यांच्याबद्दल अद्यापही नाराजी

माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काहीच केले नाही. खासदार बनसोडे यांनी चार साडे चार वर्षात सोलापूरच्या विकासासाठी योगदान दिले आहे. शिंदे यांच्याबद्दल अद्यापही जनतेत नाराजी असल्याचे मतही पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bansode will again win MP election of one lack vote says deshmukh