esakal | सांगलीतील हे उद्यान आता भाड्याने देणार नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

 Bapat Mall will not rent the park

बापट मळा कोणत्याही कार्यक्रमास किंवा समारंभास भाड्याने देणार नाही. हे उद्यान लग्न समारंभ, वाढदिवसास भाड्याने देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी महापौर व वॉर्डाची प्रतिनिधी या नात्याने त्याला विरोध करेन अशी ग्वाही महापौर गीता सुतार यांनी आज दिले. 

सांगलीतील हे उद्यान आता भाड्याने देणार नाही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : बापट मळा कोणत्याही कार्यक्रमास किंवा समारंभास भाड्याने देणार नाही. हे उद्यान लग्न समारंभ, वाढदिवसास भाड्याने देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी महापौर व वॉर्डाची प्रतिनिधी या नात्याने त्याला विरोध करेन अशी ग्वाही महापौर गीता सुतार यांनी आज दिले. 

बापट मळा उद्यान भाड्याने देणार असल्याचा फलक उद्यानासमोर लावल्यानंतर नागरिकांमध्ये क्षोभ उसळला होता. उद्याने भाड्याने देण्यास त्यांनी तीव्र विरोध केला होता. आज सकाळी महापौर गीता सुतार यांनी बापट मळा उद्यानास भेट देऊन तेथे फिरायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवावर्गाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बापट उद्यानाची पाहणी केली. उद्यानाच्या विकासाचीही त्यांनी ग्वाही दिली. 

बापट मळ्यामध्ये फिरावयास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, हास्य क्‍लब ग्रुप आदींनी उद्यान भाड्याने देऊ नये यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती. एक हजार नागरिकांनी स्वाक्षरी करून महापालिकेच्या निर्णयास विरोध केला. महापालिकेवर मोर्चा काढण्याचेही नियोजन केले होते. त्यावेळी सुयोग सुतार यांनी तत्काळ बापट मळ्यात भेट देऊन उद्यान कार्यक्रमांना भाड्याने देण्यास माझा विरोध आहे. मी तुमच्या सोबतच आहे असे आश्‍वस्त केले होते. स्वतः महापौर शनिवारी आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी व निवेदन स्वीकारण्यासाठी येतील असे सांगितले. त्यानुसार आज सकाळी महापौर सौ. गीता सुतार, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी बापट उद्यानास भेट दिली. 

यावेळी उपस्थित नागरिकांनी बापट मळ्यात गेले कित्येक वर्षे योग शिबिर, प्राणायाम शिबिर, मॉर्निंग ग्रुप, महिलांचा ग्रुप, लहान मुले, हास्य क्‍लब सुरू असल्याचे सांगितले. पै पाहुणे, व्यापारी हे सांगलीतील एक चांगले उद्यान म्हणून फिरावयास येतात. मात्र गेल्या दोन महिन्यापासून झाडांना पाणी नाही, पेव्हिंग ब्लॉक उघडले आहेत. पडलेली झाडे तशीच आहेत. लॉन खराब झाले आहे. मुलांच्या खेळण्याचे साहित्य खराब झाले आहे, संध्याकाळी अनेक लहान मुले, महिला परिसरात फिरत असतात. परंतु रात्री प्रेमीयुगले उद्यानाच्या कट्टयावर चाळे करत बसतात. मद्यपीही असतात. याकडेही महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्यान निरीक्षकाबद्दलही नाराजी व्यक्त केली. 

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्यान भाड्याने दिल्यास लोकांना अडथळा होणार. फिरणे व व्यायामासाठी जागा मिळणार नाही. पर्यावरणाचे नुकसान होणार. अनेक प्रकारचे नुकसान होईल. यासाठी बापट मळ्याचे आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही कार्यक्रमात भाड्याने देऊ नये. 

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक शहा, मदनभाऊ ओस्तवाल, महिला मॉर्निंग ग्रुपच्या भारती ओऊळकर, सुरेश मिठारे, महेश खराडे, प्रमोद परीख, सौ. शुभांगी जामदार, संजय खराडे, अजय काळे आदीसह नागरिक उपस्थित होते.