बार्शी- लातूर रस्त्यावर पिकअप पलटी होऊन एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

लातूर येथून पालघर येथे (एमएच २४, एबी ८५०६) हा पिकअप हॉस्टेलचे कॉट व गाद्या असे भाडे घेऊन जात असताना जामगावजवळ येताच वळणावर पलटी झाला. चालक गोपे याचा जागीच मृत्यू झाला.

बार्शी (सोलापूर ) : बार्शी- लातूर रस्त्यावर जामगाव येथील रिलायन्स कंपनीजवळ पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बार्शी तालुका पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.
चंद्रकांत तुळशीराम गोपे ( वय ४०, रा. नांदगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर दिनेश रेड्डी, गणेश साळुंखे अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात पहाटे सव्वादोन वाजता झाला. महेश बदाले (रा. इंदिरानगर, लातूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
लातूर येथून पालघर येथे (एमएच २४, एबी ८५०६) हा पिकअप हॉस्टेलचे कॉट व गाद्या असे भाडे घेऊन जात असताना जामगावजवळ येताच वळणावर पलटी झाला. चालक गोपे याचा जागीच मृत्यू झाला.  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पोलिस हवालदार शिरसट करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barshi Latur road accident in one killd