भिलवडी : येथील सटवाई मंदिर परिसरात यात्रा करण्यासाठी आलेल्या दहा जणांवर आज दुपारी मधमाश्यांनी हल्ला करीत जखमी केले. भिलवडी-भुवनेश्वरीवाडीदरम्यान चिंचेच्या बागेत सटवाई देवीचे मंदिर आहे. आज येथे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील पाटील कुटुंबीय पाहुण्यांसह यात्रा करण्यासाठी आले होते.