खोडसाळपणा नडला ः हरिश्चंद्र गडावर मधमाशांचा भाविकांवर हल्ला

Bee devotees attack Harishchandra fort
Bee devotees attack Harishchandra fort
Updated on

अकोले ः महाशिवराञीनिमित्त तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर भाविक दर्शनासाठी जात होते. गडाच्या मध्यभागी कपारीत मधमाश्यांचे पोळं आहे. त्या पोळ्याला कोणीतरी दगड मारल्याने मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला चढवला. आज दुपारी ही घटना घडली.

खोडसाळपणामुळे मोहळ खवळले

तालुक्यात सर्वञ शिवराञ महोत्सव सुरु आहे. तालुक्यातील विविध शिवालयात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. अशीच आज आदिवासी भागातील हरिश्चंद्र गडावरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. भाविक दर्शनासाठी जात असताना दुपारी १२ वाजेच्या दरम्यान गडाच्या मध्यभागी कपारीत असलेल्या मधमाश्यांचे पोळाला कोणीतरी अज्ञाताने दगड मारल्याने मधमाश्यांचे पोळ उठले.

जखमी भाविक झाले सैरभैर

यावेळी मधमाश्यांनी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला केला. भाविक सैरभैर होऊन पळू लागले. भविकांना आळेफाटा येथील प्रा.जयशिंग गाडेकर यांनी मदत केली. त्यांनी भाविकांना मधमाशांचे हल्ल्यातून वाचवत स्वतः च्या वाहनाने राजुर रूग्णालयात आणले.

२० भाविक जखमी

यावेळी १७ भाविकांवर ग्रामीण रुग्णालय राजुर येथे तर काही भाविकांवर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर काही भाविक आप आपल्या गावाकडे उपचारासाठी निघून गेल्याचे समजते.

जखमीची नावे अशी ः विजय भांगरे, उत्तम जारकड, कुलदिप डोळस, विष्णु बांडे, बाळासाहेब फाफाळे, राहुल देशमुख, कांंताराम शिंदे, लक्षण आवटे, सचिन राऊत आदी जखमी झाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com