Sugarcane Worker Death
esakal
खडकलाट (बेळगाव) : उसाच्या फडात सकाळी नाष्ट्याच्या वेळी पिण्यासाठी पाणी आणावयास गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू (Sugarcane Worker Death) झाल्याची घटना गळतगा (ता. निपाणी) येथे गुरुवारी (ता. २५) सकाळी घडली. सुनील बाळासाहेब तळेकर (वय २१, रा. भीमापूरवाडी, ता. निपाणी) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.