Belgaon: मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करून देण्याची वेळ परिवहन मंडळाने स्थानक उभारणीचे काम हाती घेतलेल्या कंपनीला दिले होते. पण या कालावधीत केवळ मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून अद्याप स्थानकाचे ५० टक्के काम होणे शिल्लक असल्याने पुढील वर्षी तरी स्थानक प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध असणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये स्थानकाच्या नूतनीकरनाचे काम हाती घेण्यात आले होते. चार वर्षात पूर्ण स्थानकाचे काम होणे आवश्यक होते. पण आतापर्यंत चार वेळा त्यास वाढीव मुदत देण्यात आली असून आता ही मुदत पुढील महिन्यात समाप्त होत आहे. पण येथील शिल्लक कामे पाहता आणखी मुदतवाढ त्यासाठी लागणार आहे. हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे स्थानकाच्या नूतनीकरणचे काम सोपविण्यात आले आहे. ३ एकर ८ गुंठे परिसरात हे स्थानक उभारले जात आहे.

हेही वाचा: अत्याचार झालेल्या मुलीची साक्ष न होताच डीएनए अहवालावरुन गुन्हा सिद्ध

सद्या केवळ स्थानकाची मुख इमारत तयार झाली असून इमारतीच्या आतील आणखी काही कामे अपूर्ण आहेत. तळमजल्यावरील टाईल्स फिटिंगचे क पूर्ण झाले आहे. इमारत जरी अंतिम टप्प्यात असली तरी बस टर्मिनलसाठी प्लॉटफॉर्मचे काम झालेले नाही. यासह इमारतीच्या आणखी काही भाग वाढविला जाणार आहे. त्यासह संपूर्ण स्थानक परिसरातील भाग सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे लागणार आहे. ही सर्व शिल्लक कामे पाहता डिसेंबर अखेर मुदतीपूर्वी हे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यासाठी आणखी सहा।महिन्याचा कालावधी लागू शकतो.

एकीकडे मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच स्मार्ट सिटी योजनेतून शहर बसस्थानकाचे (सीबीटी) काम हाती घेण्यात आले असल्याने मध्यवर्ती बसस्थानकच्या आवारातच तात्पुरते शेड उभारून बसेस सोडल्या जात असून याठिकाणी सुविधेपेक्षा असुविधाच अधिक आहेत. त्यासाठी किमान मध्यवर्ती बसस्थानकाचे तरी काम वेळेत पूर्ण केले जावे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

डिसेंबरअखेर मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. पण अद्याप शिल्लक कामे पाहता या मुदतीत कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.

-के. के. लमाणी, परिवहन वाहतूक नियंत्रण अधिकारी.

loading image
go to top