Belgaon: बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अटक

बेळगाव : बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अटक

बेळगाव : हलगा ते मच्छे बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी पुन्हा अटक करण्यात आली. तसेच शिवारात जमलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेऊन काम सुरूच ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढीत गुरुवारपासून मच्छे शिवारातून कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आली होती.

तसेच वेगाने काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाला विरोध दर्शवित शेतकरी दररोज शिवारात बसून आंदोलन करीत आहेत. मच्छे ते अनगोळ शिवारापर्यंत सपाटीकरण व खोदाईचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात मशीनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हलगा शिवारात दाखल झाले होते. याची माहिती मिळताच शेतकरी मोठ्या संख्येने हल्ला शिवारात जमा झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी काम सुरू करण्याची परवानगी असलेले कागद दाखवा, न्यायालयाने कामावरची स्थगिती उठवली असेल तर त्याचे कागद द्या आधी प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा: शिवसेना पुणे शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

व जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली असेच काही शेतकऱ्यांनी मशीन जवळ जाऊन काम बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना अटक केली. अटक केल्यानंतरही शेतकऱ्यानी जोरदार घोषणाबाजी करीत काम बंद करा अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोन किलोमीटर अंतरावर नेऊन शेतकऱ्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा शिवारातून हे आंदोलन केले. शेतकऱ्यांचा विरोध होऊन काम बंद पडू नये याची दखल महामार्ग प्राधिकरणाकडून घेतली जात आहे त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला जात असून न्यायालयाने झिरो पॉइंट निश्चित करण्याची सूचना करून देखील अन्यायकारक पद्धतीने बायपासचे काम हाती घेण्यात आल्याने शेततळ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तसेच बायपासच्या कामामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असला तरी या भागातील लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांची बाजू घेत नसल्याचे दिसून येत असल्याने महामार्ग प्राधिकरण अन्यायकारक काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकरी देखील हतबल झाले आहेत.

loading image
go to top