esakal | Belgaon: हलशी कदंब मंदिरात नवरात्रोत्सवाची बाराव्या शतकापासून परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

हलशी कदंब मंदिरात नवरात्रोत्सवाची बाराव्या शतकापासून परंपरा

बेळगाव : हलशी कदंब मंदिरात नवरात्रोत्सवाची बाराव्या शतकापासून परंपरा

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कदंब स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या हलशी (ता. खानापूर ) येथील पुरातन नृसिंह वराह मंदिरात बाराव्या शतकापासून नवरात्रोस्तवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा असून दरवर्षी ही परंपरा कायम राखली जात असून मंदिरातील देवांची या काळात विविध रुपात पूजा बांधली जाते त्यामुळे मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. तसेच येथे सीमोल्लंघनच्यावेळी घोडा नाचविण्याची परंपरा देखील या मंदिरात आहे.

हलशी हे गाव कदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी होती. १२ व्या शतकात हलशी येथे बांधण्यात आलेले पुरातन नृसिंह-वराह मंदीर हे एक देखणे मंदिर असून या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.

हेही वाचा: पिंपरी : सफाई कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित

या मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल कासव आहे. एका गाभार्‍यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या समोरच्याच गाभार्‍यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय देखणी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या मंदिरात दसऱ्या मध्ये 12 व्या शतकापासून विविध रुपात पूजा बांधली जाते तसेच या ठिकाणी आकर्षक सजावट केली जात असल्याने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसह भाविक मोठ्या संख्येने मंदिरातील अवतार पाहण्यासाठी येत असतात.

मंदिराराचे पुजारी पारीपत्तेदार कुटुंबाकडून ही आरास केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून देवाची पूजा बांधण्यात आली असून दसऱ्या मध्ये दररोज वेगवेगळ्या देवींच्या रूपात आरास केली जाणार आहे. हलसी आणि परिसरासह विविध भागातील भाविक याठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच मंदिरात वर्दळ पहावयास मिळत असून विजयादशमी दिवशी पालखी मिरवणूक काढून झाल्यानंतर घोडा नाचवत सीमोल्लंघनासाठी लोक निघतात.

हेही वाचा: मुंबई : दिव्यांगाना लोकलचे तिकिट, पास मिळण्याचा तिढा सुटला

काही वर्षांपूर्वी जिवंत घोडा नाचविला जात होता. मात्र काही वर्षांपासून लाकडापासून तयार करण्यात आलेला घोडा डोक्यावर ठेवून त्याला नाचविण्याची परंपरा रूढ झाली असून विशिष्ट पद्धतीने नाचविण्यात येणारा घोडा पाहण्यासाठीही या ठिकाणी गर्दी होत असते.

लहान असताना नवरात्रीमध्ये मंदिरातील अवतार पाहण्यासाठी लहान मुले व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते त्यामुळे या काळात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत होते. दरवर्षी वेगवेगळ्या रुपात पूजा बांधली जाते हे पाहताना खूप आनंद मिळतो. ठिकठिकाणी विविध बदल झालेले असले तरी मंदिरातील अनेक चालीरिती आजही कायम असल्याचे पहावयास मिळते

- आरती पारीपत्तेदार

loading image
go to top