esakal | ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते ? : श्रीमंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

SHRIMANT PATIL

ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते ? : श्रीमंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस युती सरकारला पाडण्यासाठी आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ‘भरभक्कम’ पैशाची ऑॅफर दिली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील यांनी केला होता. भाजप प्रवेशासाठी पैशाची ऑफर दिल्याचे सांगितल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपल्याला कल्पना नाही. पण, पैशाची ऑॅफर देण्यासाठी कोण आले होते, याचा खुलासा माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी करावा, असे म्हटले आहे.

माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शनिवारी (ता. ११) एका कार्यक्रमात कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश करताना पैशाची ऑफर होती. पण, ती ऑफर मी नाकारल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. याबाबत रविवारी (ता. १२) अथणीतील एका कार्यक्रमात श्री. सवदी यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी श्रीमंत पाटील यांचे वक्तव्य नेमके काय अर्थाने होते, हे मला माहीत नाही, असे सांगितले. पण, त्यांचा विषय माझ्या कानावर आला आहे. परंतु, ऑफर कुणी दिली व पैसे देण्यासाठी कोण आले होते, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. नियमानुसार केवळ ३४ जणांना मंत्रीपद मिळते. प्रत्येकाला मंत्रीपद देणे शक्य नाही. मंत्रीपद मिळाले नाही नाराज होऊन टीका करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी सवदी यांना लगावला.

राज्यात कॉंग्रेस-धजद पक्षाचे सरकार असताना माजी मंत्री रमेश जारकीहोळींसह १७ जणांनी भाजपात प्रवेश केल्याने युती सरकारचे पतन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक होऊन त्यात श्रीमंती पाटील विजयी झाले. त्यांना वस्त्रोद्योग मंत्रीपदही देण्यात आले. परंतु, अलीकडे राज्यात नेतृत्व बदल झाल्याने पाटील यांचे मंत्रीपद गेले. तेव्हापासून श्री. पाटील यांच्याकडून मंत्रीपदासाठी पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाजाच्या प्रतिनिधीला मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी होत आहे.

loading image
go to top