esakal | Belgaon: शाळा सुरू पण अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची परवड
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांची परवड

बेळगाव : शाळा सुरू पण अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची परवड

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पूर्णवेळ शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून शाळेच्या वेळेत अधिक प्रमाणात बस सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होऊ लागली आहे.

शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस अर्धा वेळ शाळा तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती करण्यात आली नव्हती मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर 100 टक्के हजेरीसह पूर्णवेळ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत दाखल होऊ लागले आहेत. मात्र अनेक मार्गांवर अपुरी बस सेवा असून अनेक बसेस अगोदरच फुलू होऊन येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरी बस येण्याची वाट पाहावी लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी हात करून देखील बस थांबवली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी जावे लागते या सर्वाची दखल घेऊन शाळेच्या वेळेत अधिक प्रमाणात बसेस सोडणे गरजेचे आहे.

हेही वाचा: कणकवली : महामार्गावरील अनधिकृत मिडलकट बंद करण्याचे निर्देश

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात मात्र एक किंवा दोनच बस असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव टांगणीवर टाकून प्रवास करावा लागत आहे याकडे परिवहन महामंडळ व शिक्षण खात्याने लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

सोमवारपासून पूर्णवेळ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात बसेस सोडाव्यात बस वेळेत मिळत नसल्याने वडापने जावे लागत असून बस थांबत नाहीत त्यामुळेही त्रास सहन करावा लागत आहे.

- भूषण चापगावकर, विद्यार्थी

पूर्ण वेळ शाळा सुरू होणे गरजेचे होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आता बसेस वेळेवर सोडाव्यात तरच विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर उपस्थित राहता येणार आहे.

- ओमकार पाटील विद्यार्थी

loading image
go to top