esakal | Belgaum: गोटुरनजीक अपघातात दुचाकीस्वार ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

संकेश्वर : गोटुरनजीक अपघातात दुचाकीस्वार ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर गोटुर गावानजीक उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरले. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शनिवारी (ता. 9) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भीमप्पा पादप्पा नाईक (वय 40, रा. उळागड्डी खानापूर, ता. हुक्केरी) असे मयताचे नाव आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भीमप्पा नाईक हे हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीने (केए 23 ईएन 3511) निघाले होते. त्यांना गोटूर नजीक अज्ञात वाहनाने ठोकर दिली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनास्थळी संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी यांनी आपल्या सहका-यांसह भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

loading image
go to top