बेळगाव - 6 उमेदवाराचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद

निवडणूक पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ५११ मतदान केंद्राची स्थापना केली आहे.
बेळगाव - 6 उमेदवाराचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद
Updated on
Summary

निवडणूक पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ५११ मतदान केंद्राची स्थापना केली आहे.

बेळगाव : जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे १० टक्के मतदान झाले. दरम्यान, दोन जागांसाठी सहा उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यापैकी खरी लढत तिघा उमेदवारांत आहे.

निवडणूक पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ५११ मतदान केंद्राची स्थापना केली असून, व्यापक बंदोबस्त आणि व्हिडिओ कॅमेरे पहिल्यांदा बसवण्यात आले आहेत. तसेच पारदर्शक व कोठेही गोंधळ निर्माण होऊ नये, हे पाहण्साठी मायक्रो ऑब्झवर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानक स्वराज्य संस्‍थांचे निर्वाचीत सदस्य, आमदार व खासदार यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यानुसार बेळगावात खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार ॲड. अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकरसह नगरसेवकांनी येथील महापालिकेमध्ये मतदानाचा अधिकार सकाळी दहा ते अकरा या दरम्यान बजावला आहे.

जिल्ह्यात तालुकास्तर निर्वाचीत सदस्य आणि ग्रामपंचाय पातळीवर ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे चुरशीच्या लढतीमध्ये या ग्रामपंचायत मतदारांचा कौल निर्णायक ठरू शकतो. त्यासाठी उमेदवार अखेरच्या क्षणी आपल्या पारड्यात ग्रामपंचायत पातळीवर अधिकाधिक मतदान पाडून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ८, ८७५ मतदार असून, एका मतदान केंद्राला ५ याप्रमाणे ३ हजाराहून अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणामध्ये असले तरी खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या नजरा भाजप, कॉंग्रेस आणि अपक्ष उमेदवाराकडे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com