बेळगाव : बेनाडीचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील सांगली जिल्हा बॅंकेवर I Prithvaraj Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : बेनाडीचे सुपुत्र पृथ्वारीज पाटील सांगली जिल्हा बॅंकेवर

बेळगाव : बेनाडीचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील सांगली जिल्हा बॅंकेवर

बेळगाव (बेनाडी) : येथील सुपुत्र आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर संचालकपदी निवड झाली. मंगळवारी (ता. २३) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, त्यात पृथ्वीराज हे संस्था गटातून विजयी झाले.

पृथ्वारीज यांचे वडील आणि बेनाडीचे सुपुत्र गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशी पदे भूषवली होती. शिवाय सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ते पहिले अध्यक्ष होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या स्थापनेपासून त्याच्या विस्तारात गुलाबराव यांनी योगदान दिले होते. गुलाबराव यांच्यामागे चिरंजीव पृथ्वीराज यांनी सांगली कार्यक्षेत्र ठेवून सहकार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरु ठेवली आहे. यापूर्वी पृथ्वीराज यांनी सांगलीतून विधानसभा निवडणूक लढवली आहे.

हेही वाचा: वानखेडेंनी माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं, निवृत्त ACP चा आरोप

आता त्यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर संचालकपदी निवड झाल्याने बेनाडीसह निपाणी परिसरातून अभिनंदन होत आहे. पृथ्वीराज सांगलीत कार्यरत असले तरी बेनाडीसह निपाणी परिसरातील सामाजिक, राजकीय कार्यातही त्यांनी आपला सहभाग ठेवला आहे. बेनाडीसह निपाणी भागात पृथ्वीराज यांना मानणारा वर्ग असून अनेकांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

loading image
go to top