
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात ऑनलाइन सेवेला प्राधान्य
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डात सद्या ऑनलाइनला प्राधान्य दिले जात आहे. इ छावणी पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही तक्रार किंवा अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. याला कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वेबसाइटमध्ये परफॉर्मन्स स्मार्ट बोर्ड नावाच्या ऑप्शनमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. किती तक्रारी आल्यावर किती तक्रारी सोडविण्यात आल्या याची माहितीही यात देण्यात आली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. इ छावणी पोर्टल सुरू केल्यापासून २२ एप्रिल पर्यँत यावर हद्दीतील ८००३ नागरिकांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ७८३४ जणांनी विविध कामासाठी अर्ज केले आहेत. यातील ७४८७ अर्जावर काम सुरू आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आतापर्यंत ट्रेड लायसन्ससाठी 211 अर्ज आले होते. यातील 173 लायसन्सला मजुरी देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात गेल्या 20 दिवसात एम कलेक्ट वर 4890 रुपये जमा झाले आहेत. तसेच 842 तक्रारी आल्या असून 99.05 टक्के तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. नळजोडणीसाठी 13 अर्ज आले होते त्यातील 10 जणांना जोडणी देण्यात आली आहे. लीजसाठी 5 अर्ज आलेले आहेत. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. इ छावणीच्या माद्यमातून 86 जन्म दाखले व 35 मृत्यू दाखले देण्यात आले आहेत. मालमत्ता करही अनेकांनी भरला आहे. 11 टँकर बुकिंग केले असून 5 जणांना टँकरातून पाणी दिले आहे.
नोंदणी आवश्यक
कॅन्टोन्मेंट बोर्डातील ज्या नागरिकांना ऑनलाइन सेवेचा लाभ किंवा अर्ज, तसेच त्रकारी करायच्या असतील तर त्यांना पहिल्यांदा इ छावणी वर आपली सम्पूर्ण महिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांना नोंदणी करताना अडचणी येतात त्यांनी बोर्डाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. इ छावणीवर आपण केलेला अर्ज किंवा तक्रार बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना दिसते. यामुळे याचा निपटाराही लवकर होतो.
Web Title: Belgaum Cantonment Board Currently Prefers Online Service Complaint Application Through E Camp Portal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..