पॅसेंजर वाहनाला लॉरीची धडक; अपघातात 26 जखमी

लोरीने धडक दिल्याने ही घटना घडली. सदर जखमींची नावे समजू शकली नाहीत.
Accident
AccidentSakal

चिक्कोडी : पंढरपूरहून चंदगड तालुक्यातील डुक्करवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर वाहनाला लॉरीने धडक देऊन झालेल्या अपघात 26 जण जखमी झाले. सदर घटना शुक्रवारी (ता.15) रोजी चिक्कोडी येथील बसव सर्कलमध्ये घडली. लोरीने धडक दिल्याने ही घटना घडली. सदर जखमींची नावे समजू शकली नाहीत.

शुक्रवारी पहाटे पंढरपूरहून चिकोडी मार्गे डुक्करवाडी येथे काही जण जात होते. यावेळी त्यांचे वाहन बसवसर्कल येथे आले असता एक अज्ञात लॉरीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात 26 जण जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर जखमींना चिककोडी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लॉरी चालकाने पलायन केले.

Accident
पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ

या घटनेची माहिती मिळताच चिककोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर सदर लॉरी जप्त केली. सदर या घटनेची नोंद वाहतूक पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com