
बेळगाव : तालुक्यात ३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान
बेळगाव : गेल्या पंधरा दिवसापूर्वी सातत्याने झालेल्या वळीव पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील ३० हेक्टर मधील फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी फलोत्पादन आणि कृषी खात्याने नुकसानीचे सर्वेक्षण करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
गत महिन्यात झालेला पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात बागायत आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी वारा तसेच गारपीट झाल्याने तालुक्यातील विशेष करून आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे आंबा खराब होण्यासह पडझड देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच गाजर आणि कोथिंबीर देखील पावसामुळे खुजली आहे. फलोत्पादन आणि कृषी खात्याने केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ३० हेक्टरमधील बागायत आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी अधिकाऱ्यानी विविध ठिकाणी भेटी देऊन पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
यावेळी झालेल्या वळीव पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे तालुक्यातील ३० हेक्टर जमिनीतील फळबागा भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. संबंधितांना भरपाई मिळावी यासाठी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
प्रवीण महेंद्रकर, उपसंचालक फलोत्पादन खाते.
Web Title: Belgaum Crops Hectares Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..