बेळगाव : डेंगीचा धोका, खबरदारी हाच उपाय

जिल्ह्यात डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, बेळगाव तालुका आघाडीवर
डेंगीचा आजार
डेंगीचा आजारesakal
Updated on

ऋतुमानामध्ये बदल झाला की, आजारपण डोकं वर काढतंच. अचानक वाढणारा ताप हे डेंगीचं एक प्रमुख लक्षण आहे. डासांपासून पसरणारा डेंगी हा आजार जीवघेणा आहे. वेळीच त्यावर उपचार न केल्यास शरीरातील रक्तात असणाऱ्या पांढऱ्या पेशी (प्लेटलेट्स) कमी होऊन प्रसंगी रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हा आजार पसरू नये, यासाठी खबरदारी हाच उपाय आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळा मध्यावर आला असून, ठिकठिकाणी पाणी साचून राहत आहे. जे डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पाणी साठू न देता आपले आवारदेखील स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी झाली पाहिजे.

- सतीश जाधव

जिल्ह्यात १०३ जणांना डेंगी

बेळगाव जिल्ह्यात तब्बल १०३ जणांना डेंगीची लागण झाली असून, ४७९ जणांच्या रक्ताची तपासणी केली आहे. डेंगी रुग्ण आढळण्यात बेळगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. यंदा जून महिन्यात ७८ जणांना डेंगीची लागण झाली, तर जुलै महिन्यात १८ जुलैपर्यंत २४ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १०३ वर पोहोचली असून, ४७९ जणांची रक्त तपासणी केली आहे. यामुळे आरोग्य खात्याकडून गावागावांत जनजागृती केली जात आहे.

डेंगीचा प्रसार

आजारी माणसाच्या रक्तातील डेंगी विषाणू ‘इडिस इजिप्‍ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. यापासून रोगाचा प्रसार होतो. साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. डेंगी हा मादी डासांच्या चाव्याद्वारे पसरतो (इडीस इजिप्ती). सुमारे एका आठवड्यानंतर, एका निरोगी व्यक्तीला चावा घेताना डास हे विषाणू संक्रमित करू शकतात. डेंगी थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत.

डासांच्या बचावासाठी

संध्याकाळी दारे बंद ठेवावीत आणि खिडक्या जाळीबंद कराव्यात. घरात असताना किंवा बाहेर जातानासुद्धा शक्यतो लांब कपडे घालावेत. शरीराचा कोणताही भाग फार उघडा राहू नये, याची काळजी घ्यावी. घरातील साठवणुकीच्या पाण्याची तपासणी करावी. वेळोवेळी पाणी बदलावे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी रात्री मच्छरदाण्यांचा उपयोग करावा. घर तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साठून राहिलेले खड्डे, डबकी बुजवावीत.

जिल्ह्यातील डेंगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जागृतीही केली जात आहे. नागरिकांना स्वतः खबरदारी घेणे गरजेचे आहे. लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. एम. एस. पल्लेद, जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी

डेंगीची लक्षणे?

  • रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे

  • तीव्र ताप येणे, डोके दुखणे, सांधे व अंगदुखी

  • डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे

  • भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशक्तपणा येणे

  • रक्ताची उलटी होणे

  • पोट दुखणे, काळसर रंगास शौचास होणे

  • त्वचेखाली नाकातून रक्तस्त्राव होणे

  • डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे व खबरदारी

  • घराभोवती व परिसरामध्ये सांडपाणी साचू न देणे

  • सर्व गटारे व नाले वाहते करावेत

  • साचलेली डबकी वाहती करणे किंवा बुझवणे

  • एक दिवस पाणी साठविण्याची भांडी किंवा टाक्या

  • धुवून कोरड्या ठेवाव्यात

  • खराब टायर, फुटके प्लास्टिक कॅन, डबे, कप, फुटके माठ नष्ट करावेत

  • घरांच्या खिडक्यांना डासरोधक जाळ्या बसविणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com