बेळगाव : महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक घ्या

नगरसेवकांची मागणी; प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर मोर्चा
बेळगाव महापालिका
बेळगाव महापालिकाsakal

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी तातडीने निवडणूक घ्या, अन्यथा महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा सोमवारी (ता. २७) नगरसेवकांनी दिला आहे. महानगरपालिका निवडणूक होऊन नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी अद्याप महापौर-उपमहापौर निवडणूक झालेली नाही. त्यामुळे उद्वीग्न झालेल्या विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सोमवारी प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी महापौर निवडणूक घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिश्‍वास यांच्या अनुपस्थितीत सहायक प्रादेशिक आयुक्त श्रीमती पीरजादे यांनी निवेदन स्वीकारले. नवनिर्वाचित नगरसेवकांना निधी देण्याची मागणीही झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती, काँग्रेस, एमआयएम व अपक्ष नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

सप्टेंबर २०२१ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. जानेवारी महिन्यात महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले.

भाजप नगरसेवकांची गोची

महापौर निवडणुकीबाबत भाजपचे नगरसेवक उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे विरोधी गटाच्या नगरसेवकांनीच पुढाकार घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन त्याची दखल घेणार का, हे पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com