Belgaum Election Update:कॉंग्रेस, भाजपात कॉंटे की टक्कर: 42 व्या फेरीत जारकीहोळी आघाडीवर

Belgaum Election Update:कॉंग्रेस, भाजपात कॉंटे की टक्कर: 42 व्या फेरीत जारकीहोळी आघाडीवर
Updated on

बेळगाव: भाजप उमेदवारांच्या मताधिक्यात घट झाली असून, भाजप उमेदवार मंगला अंगडी यांची आघाडी मोडून काढत कॉंग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी सुमारे दहा चार हजाराचे मताधिक्य घेतले आहे. यामुळे परत एकदा चुरस वाढली असून, लढत कॉंटे की टक्कर ठरली आहे.

सुरवातीपासून सुमारे दहा ते चौदा हजार मताधिक्यांनी अंगडी आघाडीवर होत्या. पण, आता मताधिक्यात घट झाली असून, त्या सुमारे दहा हजार मताधिक्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे भाजप गोटात चिंता आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवणुकीसाठी चुरशीने झालेल्या मतदानामध्ये ३२ व्या फेरीत मंगला अंगडी यांची आघाडी मोडून काढत जारकीहोळी यांनी ९ हजार ८९६ हजाराचे मताधिक्य घेतले आहे. कॉंग्रेस समर्थकांमध्ये आता चैतन्य वाढले आहे.

दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मोठी आघाडी मिळत नसल्यामुळे चुरस वाढली आहे. खऱ्या अर्थाने कॉंटे की टक्करची लढत दिसत आहे. या निवडणुकीत आणखी लक्षवेधून घेणारी बाब म्हणून महाराष्ट्र एकीरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी आता ८१ हजार मते घेतली असून, १ लाखाचा ते पार करतील, असे दिसत आहे.

४२ वी फेरी

सतीश जारकीहोळी ः २४७०६२ (मताधिक्य ९,८९६)

मंगला अंगडी ः २३७१६६

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Marathi News Esakal
www.esakal.com