esakal | सिंह, समिती व शेळकेंना 55 हजार मते; लाखाचा टप्पा गाठण्याचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

सिंह, समिती व शेळकेंना 55 हजार मते; लाखाचा टप्पा गाठण्याचा दावा

सिंह, समिती व शेळकेंना 55 हजार मते; लाखाचा टप्पा गाठण्याचा दावा

sakal_logo
By
महेश काशीद

बेळगाव: लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी पंन्नास हजाराचा टप्पा पार केला असून, यापूर्वी कधीही लोकसभा निवडणूक न लढविलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी नैतिक पातळीवरती मोठे मिळाल्याची प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत स्वाभाविकरणे राष्ट्रीय पक्ष विरोधात प्रादेशिक पक्ष अशी लढत असते. पण, या निवडणुकीमध्ये धजद निवडणूक रिंगणात नाही. राष्ट्रीय पक्षातर्फे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. भाजपतर्फे मंगला अंगडी आणि कॉंग्रेस पक्षाने सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी घोषित केली. तर महाराष्ट्र एकीकरण समिती पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरली आणि त्यासाठी युवा चेहरा शुभम शेळके यांना उमेदवारी घोषित केली. शेळके यांनी अतुलनीय कामगिरी करत 55 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिग्गज आणि राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांपुढे शेळके यांनी दिलेली कडवीझुंज लक्षणीय, लक्षवेधी ठरली आहे.

हेही वाचा- Belgaum Election Result 2021 Update:काॅग्रेसच्या जारकीहोळींची आगेकूच: अंगडी यांच्या मताधिक्यात घट; शेळकेंचे अर्धशतक

बेळगाव लोकसभा मतदार संघात आठ विधानसभा मतदार संघ असून, त्यापैकी तीन मतदार संघात मराठी भाषकांचे प्राबल्य अधिक आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ. येथे मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी भाषिकांनी दिलेल्या भरघोस मतदानामुळे शेळके यांनी 55 हजाराचा टप्पा गाठला असून, अजून पंन्नास टक्के मतमोजणी बाकी आहे. यामुळे अजून त्यांच्या मतदानात मोठी वाढ दिसेल, असा विश्‍वास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Archana Banage

loading image
go to top