बेळगाव : कॅण्टोन्मेंटकडून ऑनलाईन सेवेवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : कॅण्टोन्मेंटकडून ऑनलाईन सेवेवर भर

बेळगाव : कॅण्टोन्मेंटकडून ऑनलाईन सेवेवर भर

बेळगाव ः कॅण्टोन्मेंट बोर्डाकडून गेल्या दहा महिन्यांपासून ई-छावणीच्या माध्यमातून ऑनलाईन सेवेवर भर दिला जात आहे. कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज किंवा तक्रार केल्यानंतर त्याचा निपटाराही लवकर केला जात आहे. बोर्डाकडे आतापर्यंत ४२१ तक्रारी आल्या असून त्या तक्रारींचा ९८.१० टक्के निपटारा करण्यात आला आहे. कॅण्टोन्मेंटमधील सर्व व्यवहार पेपरलेस करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील सर्व कॅण्टोन्मेंट बोर्ड आता ऑनलाईन झाली आहेत. नागरिकांकडून ऑनलाईन तक्रारी किंवा इतर सेवाही ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. या वेबसाईटवर रोजच्या रोज अपडेट केली जात आहे. यामुळे कॅण्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना घरी बसून याची माहिती मिळत आहे. कॅण्टोन्मेंट हद्दीत कोणतीही तक्रार असल्यास ती ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनाही हे सोपे झाले आहे. कॅण्टोन्मेंट बोर्डात यापूर्वी ऑफलाईन तक्रार अर्ज केले जात होते. त्यांचे निवारणही लवकर केले जात नव्हते. यामुळे नागरिकांतून नेहमी नाराजी दिसून येत होती. ऑनलाईन सेवेमुळे महिनाभरात किंवा आतापर्यंत बोर्डाकडे किती तक्रारी गेल्या व कितीचे निवारण झाले याची माहिती ठेवावी लागत आहे.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

अर्जांचा निपटाराही जलदगतीने

या वेबसाईटवर आतापर्यंत ६८२५ जणांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ४९४७ जणांनी तक्रार व इतर कामासाठी अर्ज केला आहे. यातील ४८९८ अर्ज विचाराधीन आहेत. व्यापार परवान्यासाठी २०३ अर्ज आले आहेत. यातील १७२ जणांना परवाना देण्यात आला आहे. पाण्यासाठी ५ निवेदन आली असून यातील ४ जणांना नळ जोडणी देण्यात आली आहे. सांडपाण्याच्या ४ तक्रारी आल्या असून यातील २ तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. लीजसाठी ४ अर्ज आले आहेत. तसेच २ जणांनी जन्म दाखला तर १४ जणांनी मृत्यू दाखला डाऊनलोड केला आहे. वॉटर टँकसाठी ४ जणांनी बुकींग केले असून आतापर्यंत एक नागरिकाला वॉटर टँक दिले आहे.

loading image
go to top