बेळगाव : ईएसआय रुग्णालयाचे ‘सर्व्हर डाऊन’; अजून पाच दिवस येणार अडचणी | ESI hospital Issue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ESI Hospital line belgaum

बेळगाव : ईएसआय रुग्णालयाचे ‘सर्व्हर डाऊन’; अजून पाच दिवस येणार अडचणी

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव - अशोकनगर येथील ईएसआय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून ‘सर्व्हर डाऊन’ झाले असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील पाच दिवस ‘सर्व्हर डाऊन’च राहणार आहे. यामुळे रेफरलसाठी खासगी रुग्णालयात अर्ज केलेल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. ईएसआय कार्पोरेशनने ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी केली जात आहे.

बेळगाव शहरातील ईएसआयचे मुख्य हॉस्पीटल अशोकनगर येथे आहे. या ठिकाणाहून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना रेफरल दिला जातो. रेफरल मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कॅशलेस उपचार केले जातात. ईएसआय कार्पोरेशनकडून ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालते. ऑनलाईन नोंद केल्यानंतरच बिले मंजुर केली जातात. मात्र, सध्या सर्व्हर डाऊन असल्याने अडचणीत वाढच झाली आहे. बेळगाव शहरात ईएसआय रुग्णालयाशी संलग्नित सहा खासगी रुग्णालये आहेत. या ठिकाणी उपचार दिले जातात. मात्र, यासाठी अशोकनगर येथील ईएसआय रुग्णालयाकडून रेफरल आणणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: Belgaum : सीमाभागात लवकरच सुरु होणार साहित्याचा जागर

अशोकनगर येथील ईएसआय रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणात रेफरलसाठी अर्ज केले जातात. तसेच येथे रोज उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. किरकोळ उपचार घेण्यासाठी आलेल्यांची देखील ऑनलाईन नोंदणी होते. मात्र, ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्याने अडचणी वाढल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रक्रिया बंद-सुरु होत होती. मात्र, मंगळवारी (ता. १६) सकाळच्या टप्यात ही प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली. यासंबंधी येथील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील ईएसआय कार्पोरेशन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. पुढील पाच दिवस सर्व्हर डाऊन असणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे तातडीची सेवा म्हणून रुग्णांना ‘इमरजन्सी लेटर’ दिले जात आहे. हे पत्र संबंधीत खासगी रुग्णालयात दाखवून उपचार घेतले जात आहेत. ऑनलाईन सेवा बंद असल्याने रुग्णांच्या अडचणीत वाढच झाली आहे. देशभरात ईएसआय कार्पोरेशनची हॉस्पीटल आहे. दिल्लीतून ऑनलाईन सेवा चालते. मात्र, देशभरातच पुर्ण सर्व्हर डाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ईएसआय अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया

गेल्या पंधरा दिवसांपासून ‘सर्व्हर डाऊन’ ची समस्या येत आहे. यासंबंधी वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. मात्र, देशपातळीवर ‘सर्व्हर डाऊन’ ची समस्या आहे. रेफरलसाठी आलेल्या रुग्णांना ‘इमरजन्सी लेटर’ दिले जात आहे.

- प्रकाश फोंडे, अधिक्षक, ईएसआय हॉस्पीटल.

loading image
go to top