Belgaum : सीमाभागात लवकरच सुरु होणार साहित्याचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum : सीमाभागात लवकरच सुरु होणार साहित्याचा जागर

Belgaum : सीमाभागात लवकरच सुरु होणार साहित्याचा जागर

बेळगाव : मराठी भाषेची जपणूक करण्यासाठी दरवर्षी सीमाभागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. यंदाही संमेलने भरणार आहेत. बेळगाव शहर व परिसरात दरवर्षी १२ साहित्य संमेलने होतात. यंदा ४ संमेलनाच्या आयोजकांनी संमेलन तारीखा जाहीर केल्या आहेत. यामुळे सीमाभागात लवकरच साहित्याचा जागर सुरु होणार आहे.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

बेळगाव शहरातील साठे प्रबोधिनीच्या मराठी साहित्य संमेलनाने दरवर्षी सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांना सुरुवात होते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे संमेलन भरविले जात होते. मात्र, यंदा कोरोनामुळे व शाळा उशीरा सुरु झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात हे संमेलन होत आहे. या संमेलनानंतर उचगाव, कडोली व कुद्रेमानी ही संमेलने देखील पार पडणार आहेत. या संमेलनांच्या परवानगीची व अन्य तयारीत हे संमेलन आयोजक गुंतले आहेत. मात्र, अध्यापही ८ संमेलनांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यांच्याकडून देखील यंदा संमेलन भरविले जाणार आहे. त्यामुळे त्यांनी देखील संमेलनांच्या तारखा जाहीर कराव्या अशी मागणी रसिक श्रोत्यातून केली जात आहे.

बेळगाव शहर व आसपास तसेच खानापूर व निपाणी परिसरात बेळगुंदी, सांबरा, येळ्ळूर, माचीगड, कारदगा, मंथन, निलजी, फिरते गुंफन साहित्य संमेलन, उचगाव, कडोली, कुद्रेमानी व साठे प्रबोधिनी ही १२ संमेलने होतात. मात्र, यातील आठ संमेलनांच्या तारखा अध्यापही जाहीर झालेल्या नाहीत.

बेळगाव शहर व आसपास असलेल्या साहित्य संमेलनांना मोठी परंपरा आहे. सुमारे तीन तपापासून या ठिकाणी संमेलने होतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षी अडचणी आल्या आहेत. यामुळे अगदी साधेपनाने साहित्य संमेलने पार पडली. मात्र, कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. इतर कार्यक्रम होत आहेत. यामुळे यंदाही संमेलने कोरोनाचे नियम पाळत उत्साहात करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

या तारखेला होणार संमेलन

ठिकाण तारीख

  • साठे प्रबोधिनी : १८ डिसेंबर

  • उचगाव : २ जानेवारी

  • कडोली : ९ जानेवारी

  • कुद्रेमानी : १६ जानेवारी

"सीमाभागातील मराठी भाषेचे जतन करण्यासाठी दरवर्षी गावात मराठी साहित्य संमेलन भरविले जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षी साधेपनाने संमेलन झाले. यंदाही कोरोनाचे नियम पाळत संमेलन होईल. अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करतील."

-पी. एल. गुरव, अध्यक्ष, कुद्रेमानी, संमेलन

loading image
go to top