Belgaum : उचगावात शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकांत शंकर जाधव

Belgaum : उचगावात शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

उचगाव : शेतकऱ्याने राहत्या घराशेजारील भाऊबंदाच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उचगावात (ता. बेळगाव) गुरुवारी (ता. ३०) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत शंकर जाधव (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. पण, शेतीच्या पैशांच्या व्यवहारातून त्यांनी जीवन संपविल्याचा संशय त्यांच्या मुलाने व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, श्रीकांत सकाळी दहाच्या सुमारास शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडले. पण, दुपार झाली तरी ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता घराच्या गच्चीतून आंब्याच्या झाडाला मृतदेह लटकत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनाला आले. त्यांच्या मुलाने आंब्याच्या झाडाकडे धाव घेतली असता श्रीकांत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

ते मरण पावल्याचे समजताच त्यांच्या पत्नी व मुलाने हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. काकती पोलिस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वडील शेतीच्या पैशांच्या व्यवहारातून ते अस्वस्थ होते. भावकीतील भांडण व पैशांचा व्यवहार मिटवण्यासाठी त्यांनी गावातील पंचाकडेही प्रयत्न केले होते, असे त्यांचा मुलगा राजू जाधव यांनी सांगितले.

Web Title: Belgaum Farmer Commits Suicide Strangulation Uchgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..