बेळगाव : ‘RTE’ची पहिली यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

बेळगाव : ‘RTE’ची पहिली यादी जाहीर

बेळगाव : शिक्षण खात्याने ‘आरटीई’ची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात १७५, तर राज्यात ७,५९६ जागांचे वाटप करण्यात आले आहे. २०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव असलेल्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पालकांनी अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शिक्षण खात्याने मार्च महिन्यात अर्ज भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर अर्जात वाढ होत राज्यात २० हजार पालकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने ‘आरटीई’ प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४१ शाळांना ‘आरटीई’ लागू होते. पहिल्या यादीत ४१ शाळांमध्ये प्रवेशासाठी १७५ जागा मंजूर करण्यात आल्या असून ‘आरटीई’ यादीत नाव आलेल्या पालकांनी संबंधित शाळांमध्ये आवश्यक कागदपत्रे दाखल करून प्रवेश घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटामुळे यावेळी ‘आरटीई’च्या सर्व जागा भरती होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आरटीईच्या ४०० जागा उपलब्ध आहेत. यापैकी १७५ जागा पहिल्या यादीत मंजूर करण्यात आल्या आहेत.

१६ मे पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू

आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ एप्रिलनंतर प्रवेशाची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. १६ मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे यादीत नाव आलेल्या पालकांनी आपला प्रवेश वेळेत निश्चित करावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरटीईची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून पहिल्या यादीत नाव आलेल्या पालकांनी वेळेत प्रवेश घ्यावा. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

- बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी.

Web Title: Belgaum First List Rte Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..