बेळगाव : मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मांगूरला रंगणार मॅटवरील कबड्डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu-Kadu

बेळगाव : मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मांगूरला रंगणार मॅटवरील कबड्डी

बेळगाव : मांगूर रविवारी (ता. 28) रोजी सायंकाळी चार वाजता 65 किलो मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख शिवकुमार बोधले यांनी माहिती दिली.

मांगूर येथे आयोजित बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, या स्पर्धेतील प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार, तीन हजार रूपये बक्षीस व शिल्ड देण्यात येणार आहे. अंतिम सामन्यातील बेस्ट रायडर व बेस्ट डिफेंडरला देखील शिल्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.

हेही वाचा: एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

या स्पर्धेसाठी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते शंभूराजे खलाटे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाअध्यक्ष स्वप्नील पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयराज कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकीस शकील नगरजी, स्वप्निल कमते, वैभव जाधव, अनुज बोधले, गणेश बोधले, शुभम बोधले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top