बेळगाव : जारकीहोळींनी वाढवली भाजपची चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

बेळगाव : जारकीहोळींनी वाढवली भाजपची चिंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने एका जागेवर उमेदवार उभा करण्याचे निश्र्चित केले आहे. भाजपकडून पहिल्या जागेवर विद्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी निश्र्चित मानली जात आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी लखन जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याची मागणी जारकीहोळी बंधूंनी लावून धरली आहे. मात्र, लखन यांना उमेदवारी दिल्यास कवटगीमठ यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आपले बंधू लखन यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. गोकाक, अरभावी मतदारसंघातील तालुका पंचायत, ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर परिषद सदस्यांच्या सभा घेऊन वातावरणनिर्मिती सुरु केली आहे. त्यांनी दिल्लीवारीही केली आहे. जिल्‍ह्यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेण्याची ग्वाही त्यांनी पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष

लढण्याची तयारी लखन यांनी केली आहे. त्‍यामुळे, भाजपची गोची झाली आहे. लखन यांना उमेदवारी दिल्यास पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

दुसरीकडे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर जारकीहोळी कुटुंबीय केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळेस लखन जारकीहोळी भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी झाले तर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार बंधूंना आमदार होण्याचा मान मिळणार आहे.

loading image
go to top