बेळगाव : सीमाभागात परत कानडी वरवंटा

कन्नड प्राधिकरणाकडून अनेक फतवे
Belgaum
Belgaum sakal

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात परत एकदा कन्नडचा वरवंटा फिरविण्याचा घाट घातला जात आहे. कन्नड सक्तीसाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यामध्ये व्यापार संकुलांसह दुकानांच्या पाट्या येत्या पंधरा दिवसांत कन्नडमध्ये लिहिल्या जाव्यात. त्याची कार्यवाही न करणाऱ्या व्यापारी संकुल आणि दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा वा नूतनीकरण थांबविले जावे, या आशयाचा अजब फतवा कन्नड विकास प्राधिकरण अध्यक्षांनी बजाविला आहे. तसेच उचगावातील स्वागतकमानीचा फलक कन्नडमध्ये लिहावा, असा शहाणपणाचा सल्लाही सुनावला आहे.

कन्नड विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड होऊन तीन वर्षे लोटलेल्या टी. एस. नागाभरण पहिल्यांदा दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर होते. या दरम्यान रोषाला सामोर जावे लागले. त्याशिवाय त्यांनी या दौऱ्यात विविध स्वरूपाचे अनाठायी फतवे काढत आपले हसे करून घेतले आहे. उचगावमध्ये स्वागत कमान मराठीत आहे. याविरोधामध्ये कन्नड संघटनांनी गरळ ओकल्यानंतर तेथे आता कन्नडचा वरंवटा फिरविला जावा, या आशयाच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालयामधील कामकाज हे सक्तीने कन्नडमधून करण्यात यावे. माहिती आणि पत्रव्यवहार कन्नडमधून व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत नागाभरणा यांनी बजावली आहे.

सरकारी संकेतावर ऑनलाईन माहिती कन्नडमध्ये असावी. सरकारी शाळा अभ्यासक्रमात प्रथम भाषा कन्नड असावी. रस्ते, उद्यानांना कन्नडच्या महनीय व्यक्तींची नावे द्यावीत. शहरामधील प्रसिद्ध हॉटेल, दुकान, व्यापारी संकुलांचे फलक कन्नडमध्ये न लिहिल्यास परवाना रद्द करण्यात यावा किंवा परवाना नूतनीकरण करू नये. कित्तूर-निपाणी राष्ट्रीय महामार्ग दरम्यान कन्नड फलक लावण्यात यावेत, अशी सूचना नागाभरणा यांनी केली आहे.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी सातत्याने मराठीतून कागदपत्रे द्यावीत. सरकारी माहिती आणि तपशील मराठीत मिळावे, या आशयाची मागणी केली आहे. या संदर्भातील न्यायालय निकाल, भाषिक अल्पसंख्याक आयोग व राष्ट्रपतींना बजाविलेल्या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी व केंद्राला पाठविले आहे. त्याची कार्यवाही दूरच उलट आता कन्नडचा वरवंटा फिरवण्यासाठी घाट घातला जात आहे. यावेळी कन्नड प्राधिकरणाचे सचिव संतोष हणगल, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, डीसीपी रवींद्र गडादी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, नगरविकास योजनाधिकारी ईश्‍वर उळागड्डी, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री उपस्थित होते.

मराठी संपविण्याचे षड्‍यंत्र

बेळगावसह सीमाभागातील मराठीपण मिटवण्याचे षड्‍यंत्र सुरू झाल्याचा संशय येत आहे. गंभीर बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर मराठी संवर्धन आणि रक्षणाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून कन्नडसक्ती अंमलबजावणीची येथे ग्वाही देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com