
सोमवार पर्यंतची मुदत; खड्यांमध्ये वृक्षरोपन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध
बेळगाव : खानापुरात 'मए समिती'चे रास्ता रोको आंदोलन यशस्वी
खानापूर - समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन तास बेळगाव-पणजी महामार्ग रोखून धरला होता. यावेळी रस्त्यारील खड्यांमध्ये वृक्षरोपन करून तालुका आणि राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरासह तालुक्यातील संपर्क रस्त्यांची दैना उडाली असून काँग्रेस आणि भाजपकडून केवळ पोस्टरबाजी सुरू आहे.
सर्वसामान्यांच्या समस्यांकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे यावेळी माजी आ. दिगंबर पाटील यांनी सांगितले. मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, नारायण कापोलकर, बाळासाहेब शेलार, मारुती गुरव, सदानंद पाटील, प्रकाश चव्हाण विशाल पाटील, सदानंद मासेकर, माऱ्याप्पा पाटील आदींसह समिती नेते उपस्थित होते.
हेही वाचा: शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा
पोलिसांनी आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने त्याला न जुमानता रस्त्यावर ठिय्या मांडला. काही काळ पोलिसांनी जबरदस्तीने वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी घोषणाबाजी करत संपूर्ण चौक व्यापून टाकला. यामुळे दोन्ही बाजूला किलो मीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.
येत्या सोमवारच्या पूर्वी रुमेवाडी क्रॉसपासून गोवा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार प्रवीण जैन यांनी दिले. सोमवारपर्यंत दुरुस्ती न झाल्यास पुन्हा तहसीलदार कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन हाती घेऊ, असा इशारा समिती नेत्यांनी दिला. यावेळी ग्रामीण भागातील समिती कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थितीत दर्शवत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा: चेंगराचेंगरी : श्रावण सोमवारी बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात २ महिलांचा मृत्यू
Web Title: Belgaum Khanapur Maharashtra Ekikaran Samiti Protest Against Bad Condition Of Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..