esakal | बेळगाव : गुन्हेगारीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बेळगाव : गुन्हेगारीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहर उपनगरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या गुन्हेगारी प्रकरणासह सर्व प्रकरणांचा तपास करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून अनेक रखडलेल्या प्रकरणाचा तपास विविध पोलिस ठाण्यांच्यावतीने लावण्यात येत आहे.

बेळगाव शहरात ग्रामीण भागात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिवसा तसेच रात्रीच्या घरफोडीच्या घटनात वाढ झाली आहे. मोटरसायकली पळविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उपनगरातील बंद घरे फोडण्यासह लुटमारीच्या घटना देखील घडत आहेत. या सर्व प्रकरणाची गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे बंद पथदीप सुरू करण्याची सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यातच रखडलेला सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली असल्याने शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्यावतीने अनेक गुन्हे प्रकरणांचा छडा लावण्यात येत आहे.

"शहरातील वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर रखडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे."

- पी.व्ही. स्नेहा. पोलीस उपायुक्त.

loading image
go to top