esakal | बेळगाव : ५ दिवसांच्या गणशोत्सवाला मंडळांचा आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

बेळगाव : ५ दिवसांच्या गणशोत्सवाला मंडळांचा आक्षेप

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : कोरोनाबाबत खबरदारीसह संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन शासनाकडून यंदाच्या गणोशोत्सव सणावर निर्बंध घातले आहे. सुधारीत नियमावली जाहीर करताना गणशोत्सव ५ दिवसांचा केला आहे. त्याला गणेशोत्सव महामंडळ व विविध गणेशोत्सव मंडळांनी आक्षेप घेऊन ५ दिवसांची मर्यादा उठवली जावी. उत्सवासाठी अकरा दिवस द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता.७) झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीमध्ये महामंडळ आणि सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी अकरा दिवस गणशोत्सव साजरा करण्याची भुमिका मांडली. त्यावर जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी शासनाला प्रस्ताव पाठविला जाईल, अशी माहिती दिली. तसेच गणशोत्सवासाठी एक खिडकी सेवा सुरु करून त्याद्वारे मंडळांना एका ठिकाणीच सर्व स्वरुपाच्या सेवा दिल्या जातील. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित केली आहे. त्याचे पालन केले जावे. 20 पेक्षा जास्त जण एकत्र येऊ नये, मंडळ पदाधिकाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण न झाल्यास तशी व्यवस्था विभागाकडून केली जाईल, अशी माहिती दिली.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

सांस्कृतिक-मनोरंजन कार्यक्रमावर निर्बंध :

गणेशोत्सवात संगीत, सांस्कृतिक, डीजे, नृत्य वा मनोरंजन कार्यक्रम घेता येणार नाही. गणपती मुर्ती प्रतिष्ठाण, विसर्जनदिवशी मिरवणूक काढली जाणार आहे. मास्क व सॅनिटायझर वापर केला जावा. नियम प्रत्येकांनी पाळावे. नियम मोडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंदविला जाईल. महाराष्ट्रात दोन दिवसांपासून कोविड संसर्ग वाढतोय. यामुळे कोविड नियम पाळावेत, असे हिरेमठ यांनी कळविले.

* ५ दिवस मर्यादेला विरोध

लोकमान्य टिळक गणशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी कोविड पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे घोषित करण्यात आली आहेत. त्यात सणावर घातलेली मर्यादा अन्यायकारक आहे. ५ दिवस गणशोत्सव साजरा करण्यासाठी घातलेली मर्यादा मागे घ्यावी. मंडळांचा निर्बंधला विरोध आहे. शासनाला सदरबाब कळवून ११ दिवसांसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. शाहपूर विभागातर्फे नेताजी जाधव यांनी मत मांडताना गणेशोत्सवासाठी पाच दिवसांची मर्यादा चर्चेचा विषय आहे. सण अवघ्या काही दिवसांवर असताना मर्यादा घालून परंपरा मर्यादित केली आहे. त्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. यामुळे निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली.

पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे, अशोक दुदागुंटी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रुद्रेश घाली, उपस्थित होते.

loading image
go to top