बेळगाव : मारवाडी भाषिकांचे विविध समाजांबरोबर सौहार्दाचे संबंध

५० हजारांवर लोकसंख्या; महापूर तसेच कोरोना काळात भरीव कार्य
Belgaum Marwadi speaker
Belgaum Marwadi speakersakal
Updated on

बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात सुमारे १०० ते १५० वर्षांपासून मारवाडी भाषिकांचे वास्तव्य आहे. मूळचे राजस्थान येथील हे नागरिक आहेत. बेळगावात सुमारे ५० हजार मारवाडी भाषिक आहेत. बेळगावातील सर्व भाषिकांसोबत मिळून व मिसळून ते राहतात. विविध समाजाबरोबर त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत.

बेळगाव शहराला नदी किंवा नैसर्गिक आपत्तीचा कोणताही धोका नाही, हा विचार करून मारवाडी भाषिक बेळगावला आले असल्याची माहिती मिळाली. हे भाषिक कपडे, तयार कपडे व अन्य व्यापारात आहेत. जैन, माहेश्‍वरी समाज, अगरवाल समाज, रजपूत समाज, चौधरी, पुरोहित, घांची या समाजातील भाषिक मारवाडी भाषा बोलतात. प्रत्येक समाजाचे बेळगावात देवस्थान असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतात. राजस्थानातील हे भाषिक बेळगावात अनेक वर्षापासून वास्तव्यास असल्याने राजस्थानी, मारवाडी भाषेबरोबर, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी व काहींनी तमिळ भाषाही अवगत आहे. चौधरी, पुरोहित, रजपूत, भंडारी आदी आडनावे आहेत.

या समाजाच्या नागरिकांचे वास्तव्य सदाशिवनगर, मराठा कॉलनी, शहापूर, वडगाव आदी ठिकाणी आहे. स्टील व औद्योगिक वसाहतीत काहींचे कारखाने देखील आहेत. मारवाडी भाषिकांची मुले मराठी, कन्नड व इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. या भाषिकांनीही बेळगाव शहरात वेगळेपण जपले आहे. पांगुळ गल्ली, शहापूर विठ्ठल देव गल्ली आदी ठिकाणी या भाषिकांची मंदिरे आहेत. मारवाडी युवा मंच, राजस्थानी युथ क्लब, राजस्थानी युवक सेवा मंडळ व विविध मंडळांच्या माध्यमातून समाजातील भाषिकांसाठी कार्य केले जाते. बेळगावात २०१९ साली आलेला महापूर व कोरोना काळात समाजाने भरीव काम केले आहे.

बेळगावात राजस्थानातून आलेले ५० हजार भाषिक बेळगावात आहेत. जैन, माहेश्‍वरी, रजपूत, चौधरी, घांची समाजाचे नागरिक मारवाडी भाषा बोलतात. बेळगावात एकमेकांसोबत ते गुण्यागोविंदाने राहतात.

- सुभाष भंडारी, मारवाडी भाषिक

मारवाडी भाषिकांची मुले मराठी, कन्नड व इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. प्रत्येक समाजाचे मंदिर बेळगावात आहे. त्या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मंचतर्फे कोरोनाकाळात भरीव काम केले आहे.

- संजय पुरोहित, अध्यक्ष, मारवाडी युवा मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
why milk collection is falling in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com