belgaum corporation
belgaum corporationsakal media

Belgaum : विधानसभेनंतरच महापौर निवडणूक?

ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय नाहीच; नगरसेवकांची वाढली नाराजी

बेळगाव : नोव्हेंबर सरला तरी बेळगावच्या महापौर निवडणुकीबाबत निर्णय झालेला नाही. आगामी विधानसभा निवडणूक झाल्यावरच महापौर निवडणूक होईल, अशी अटकळ नगरसेवकांकडून बांधली जात आहे. २०२३ ला एप्रिल किंवा मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी चार-पाच महिन्यांचाच कालावधी आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सध्या ओबीसी आरक्षणाबाबत कोणताच निर्णय घेण्याची घाई नाही.

विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतला तर त्याचे परीणाम विधानसभा निवडणुकीत होवू शकतात. त्यामुळेच ओबीसी आरक्षणासाठी स्थापन केलेल्या आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतरही तो सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणानुसार कर्नाटकात निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. त्याचाच फटका बेळगाव महापौर निवडणुकीला बसला आहे. अशीच स्थिती राहिली तर नूतन नगरसेवकाना शपथविधी व महापौर निवडणुकीसाठी विधानसभा निवडणूक होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

१९८४ ला पहिले लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यापासून महापालिकेचे कामकाज प्रशासकांकडून प्रदीर्घ काळापर्यंत चालविले गेले नाही. १० मार्च २०१९ रोजी महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पुढील सहा महिन्यात महापालिका निवडणूक होणे आवश्‍यक होते. पण महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल झाली.

त्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे महापालिका निवडणुकीलाही विलंब झाला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. ६ सप्टेबर २०२१ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे महापौर निवडणूक लगेचच होईल अशी शक्यता होती, पण १५ महिन्यानंतरही निवडणूक झालेली नाही.

उपमहापौरपद इतर मागास ब प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव

बेळगावचे उपमहापौरपद इतर मागास ब प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळेच निवडणूक घेणे शक्य झालेले नाही. जोवर ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होणार नाही, तोवर महापौर निवडणूक होणार नाही हे नक्की आहे. निवडणुकीसाठी यंदाच्या वर्षात अनेक मूहूर्त काढले गेले, पण ते मूहूर्त वाया गेले.

साडेतीन वर्षांपासून प्रशासक

बेळगावची महापालिका निवडणूक होऊन ६ डिसेंबरला १५ महिन्यांचा कालावधी लोटणार आहे. निवडणूक झाल्यानंतर लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येण्यास बेळगावात याआधी इतका विलंब झाला नव्हता. याआधी २०१३ ला झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर १२ महिन्यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले होते, पण यावेळी विलंब झाला आहे. महापालिकेत साडेतीन वर्षांपासून प्रशासकांची नियुक्ती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com