बेळगाव महापालिकेत माजली खळबळ : कर्मचाऱ्याला झाली कोरोनाची लागण...

मल्लिकार्जुन मुगळी
Wednesday, 15 July 2020

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे कोनवाळ गल्लीतील उत्तर उपविभाग १ हे कार्यालय बंद करण्याचा आदेश आयुक्त के एच जगदीश यांनी दिला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सहायक महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक यांच्यासह दहा जणांना क्वारन्टांईन होण्याची सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा- पंचगंगा स्मशानभूमीत 16 कोविड योद्धे 24 तास कार्यरत
वाचा सविस्तर...

 

गेली तीन महिने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारन्टांईन करण्याचे महत्वाचे काम महसूल विभागाचे कर्मचारी करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. आता पालिका कर्मचारीच बाधित झाल्याने पुन्हा हा मुद्दा  चर्चेत आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवडाभरापासून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे पण कोरोना विभागीय कार्यालयात घुसला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum municipal corporation employee corona virus infected