
आक्षेप नोंदविण्यास दोन आठवड्यांची मुदत मिळाली आहे.
बेळगाव : राज्यशासनाकडून बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांचे तात्कालीक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 2018 सालच्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच हे प्रभार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक होणार हे नक्की झाले आहे. महापालिका निवडणूकीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठासमोर याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू असतानाच आरक्षण जाहीर करून शासनाने धक्का दिला आहे. या आरक्षणावर आता आक्षेप मागविण्यात येणार आहेत.
आक्षेपांची पडताळणी करून लवकरच अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले जाणार आहे. 16 जानेवारी रोजी ही आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पंधरा दिवसात या आरक्षणार आक्षेप नोंदवावे लागणार आहे. आक्षेप लेखी स्वरूपात व कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करावे लागणार आहेत. नगरविकास खात्याचे सचिव ए. विजयकुमार यांनी ही अधिसूचना काढली आहे.
हेही वाचा - Gram Panchayat Results : गाव करील ते राव काय करील: चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या गावातच मोठा धक्का -
बेळगावातील 58 प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक - आरक्षण
संपादन - स्नेहल कदम