
बेळगाव : अशिक्षित कैद्यांना (uneducated prisoners) अक्षराची ओळख करून देण्याचा प्रस्ताव (Alphabets identification) गृहखात्याने (home ministry) तयार केला आहे. बेळगावसह (belgaum) राज्यातील कारागृहातील कैद्यांचे सर्वेक्षण (Prisoners survey) सुरु असून त्यामध्ये सुमारे ६ हजार कैदी अशिक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना शिक्षणाची ओळख (education training) करुन देताना अक्षर गिरविणे शिकविले जाणार आहे.
कळत-नकळत चूक झालेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. अशातही अशिक्षित कैद्यांचे जगणे खूपच कठीण असते. त्यामुळे शिक्षा झालेल्या कैद्यांना शिक्षण देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबत पुढील आठवड्यापासून शिक्षकांची नियुक्ती करून नियमित शिक्षण देण्यास सुरुवात केले जाणार आहे. ज्या कैद्यांकडे थोडेफार शिक्षणाचे ज्ञान आहे, त्यांना पुढील शिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला जाणार आहे.
कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्याने अंगठा लावून प्रवेश घेतलेला असल्यास त्याला तेथून जाताना किमान सही तरी करता यावी, या स्वरुपाचे शिक्षण देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. कच्चा कैदी, शिक्षा घोषित झालेल्या कैद्यांसाठी हे शिक्षण असणार आहे. शिक्षणाचा कालावधी दोन ते तीन महिन्यांपासून शिक्षा असलेल्या दिवसापर्यंत असणार आहे. त्यासाठी वेळापत्रकही तयार केले जात आहे.
शिक्षणाबाबत तिरस्कार असणाऱ्या किंवा शिक्षणाचा गंधही नसलेल्या कैद्याला शिक्षणाप्रती गोडी निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. बेळगावसह राज्यात सुमारे सोळा हजार कैदी असून त्यापैकी किती कैदी अशिक्षित आहेत, याची माहिती घेतली जात आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार सुमारे ६ हजार कैद्यांना अक्षराची ओळख नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शिक्षणामुळे माणसात अनेक चांगले बदल घडू शकतात. शिवाय शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही थोडाफार बदलणे शक्य होईल. शिक्षणामुळे कैद्यात सुधारणा होईल, असा विश्वास गृहखात्याला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.