esakal | बेळगाव : रुंदीकरणाला विरोध नाही, शेतकऱ्यांचे नुकसान नको
sakal

बोलून बातमी शोधा

belgaon

बेळगाव : रुंदीकरणाला विरोध नाही, शेतकऱ्यांचे नुकसान नको

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच येथे असलेल्या टोल नाक्यावर अनेक युवकांनी कर्ज काढून उद्योग, व्यवसाय स्थापन केला आहे. हे सर्व व्यवसाय रुंदीकरणात बंद पडणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला आपला विरोध नसून तेथे होणाऱ्या अन्य गोष्टींना विरोध असल्याचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिले.

चिक्कोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची सुपीक जमीन न घेता टोलनाक्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेल्या माळरानातील जमीन यासाठी घ्यावी. या ठिकाणी युवकांनी अनेक उद्योगधंदे सुरू केले आहेत. यासाठी शासनाने टोलनाका व इतर ऑफिस अन्यत्र करावी.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चोनाप्पा पुजारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले, युवराज माने, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सचिन माने, दादासाहेब माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, विजय मोहेरवाडे, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनीर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वड्डर, संतोष चौगुले, अमोल मल्लाडे, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सचिव कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार उपस्थित होते.

loading image
go to top