esakal | बेळगावला मुंबईपासून का नाही धोका ; वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum not threatened from Mumbai Read more

महाराष्ट्र आणि मुंबईमधील लोकांना कर्नाटकात प्रवेश दिल्यानंतर सर्वाधिक धोका बेळगावला असेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती; पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे.

बेळगावला मुंबईपासून का नाही धोका ; वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगावः महाराष्ट्र आणि मुंबईमधील लोकांना कर्नाटकात प्रवेश दिल्यानंतर सर्वाधिक धोका बेळगावला असेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती; पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. तिसऱ्या लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील प्रवाशी, भाविक, स्थलांतरीत मजुरांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, याबाबतीत बेळगाव जिल्हा सुरक्षित राहिला आहे. जिल्ह्यात आलेल्या मुंबईच्या सात जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले असले, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे. 

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 140 असून त्यापैकी महाराष्ट्राहून आलेल्या नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मुंबईहून आलेल्या 7 तर कोल्हापूरच्या दोघांचा समावेश आहे. आंतरराज्य प्रवासासाठी मार्ग खुला केल्यास सर्वाधिक धोका बेळगावला होण्याची भिती व्यक्‍त केली जात होती. खासकरून महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांमुळे याचा धोका बेळगावला सर्वाधिक असेल, असा बांधलेला अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांपासून आतापर्यंत बेळगाव सुरक्षित राहिले आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात तर कोरोनाने कहरच केला आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कर्नाटककडून महाराष्ट्रासाठी दरवाजे एक आठवड्यासाठी खुले करुन त्यानंतर परत मार्ग बंद केले आहेत. दरम्यान, आतापर्यंत उपलब्ध आकड्यांवरून राज्यामधील विविध जिल्हे कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्याला आंतरराज्य प्रवास कारणीभूत ठरला आहे. खासकरून मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. 

आंतरराज्य प्रवास बाधितांची संख्या 
मुंबई ते बेळगाव
कोल्हापूर ते बेळगाव 
अजमेर ते बेळगाव  23 
झारखंड ते बेळगाव  20 
दिल्ली ते बेळगाव 
loading image