बेळगाव : एक लाख ४० हजार मतदार बजावणार हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voters

बेळगाव : एक लाख ४० हजार मतदार बजावणार हक्क

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघामध्ये २५ हजार मतदार आहेत. कर्नाटक पदवीधर वायव्य मतदार संघातील मतदारांची संख्या २० हजार, कर्नाटक पश्चिम मतदारसंघातील मतदारांचा आकडा १७ हजार आहे. तिन्ही मतदारसंघ मिळून सुमारे १ लाख ४० हजार मतदार आहेत.

विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली आहे. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क वाढविला आहे.

कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये २५ हजार ३८८ मतदार आहेत. कर्नाटक वायव्य पदवीधर संघातील मतदारांची संख्या ९९ हजार ५७८ आहे. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघामध्ये १७ हजार ९७३ मतदार आहेत. तसेच ७८ मतदान केंद्रे असून ४ अतिरिक्त केंद्रेही स्थापण्यात येत आहेत. तर १५ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

कोरोनाचे नियम पाळत मतदान, मतमोजणी

कोरोनाबाबतची नियमावली पाळत मतदान आणि मतमोजणी घेण्याचे आदेश आहेत. शिवाय त्यासाठी एक समिती आहे. या समितीतर्फे नियोजन आणि कार्यवाही केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणीही नियम पाळले जातील.

मतदानाच्या वेळेत

१ तास वाढ

निवडणूक विभागातर्फे मतदानाची तारीख आणि वेळ घोषित केली होती. त्यात मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या १३ जूनला मतदान असून त्यादिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार होते. मात्र, आता सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. १ तास मतदानाची वेळ वाढवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव, ता. ८ ः विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघामध्ये २५ हजार मतदार आहेत. कर्नाटक पदवीधर वायव्य मतदार संघातील मतदारांची संख्या २० हजार, कर्नाटक पश्चिम मतदारसंघातील मतदारांचा आकडा १७ हजार आहे. तिन्ही मतदारसंघ मिळून सुमारे १ लाख ४० हजार मतदार आहेत.

विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली आहे. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क वाढविला आहे.

कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये २५ हजार ३८८ मतदार आहेत. कर्नाटक वायव्य पदवीधर संघातील मतदारांची संख्या ९९ हजार ५७८ आहे. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघामध्ये १७ हजार ९७३ मतदार आहेत. तसेच ७८ मतदान केंद्रे असून ४ अतिरिक्त केंद्रेही स्थापण्यात येत आहेत. तर १५ जून रोजी मतमोजणी

होणार आहे.

कोरोनाचे नियम पाळत मतदान, मतमोजणी

कोरोनाबाबतची नियमावली पाळत मतदान आणि मतमोजणी घेण्याचे आदेश आहेत. शिवाय त्यासाठी एक समिती आहे. या समितीतर्फे नियोजन आणि कार्यवाही केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणीही नियम पाळले जातील.

मतदानाच्या वेळेत

१ तास वाढ

निवडणूक विभागातर्फे मतदानाची तारीख आणि वेळ घोषित केली होती. त्यात मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या १३ जूनला मतदान असून त्यादिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार होते. मात्र, आता सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. १ तास मतदानाची वेळ वाढवली आहे.कोरोनाबाबतची नियमावली पाळत मतदान आणि मतमोजणी घेण्याचे आदेश आहेत. शिवाय त्यासाठी एक समिती आहे. या समितीतर्फे नियोजन आणि कार्यवाही केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणीही नियम पाळले जातील.

मतदानाच्या वेळेत १ तास वाढ

निवडणूक विभागातर्फे मतदानाची तारीख आणि वेळ घोषित केली होती. त्यात मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या १३ जूनला मतदान असून त्यादिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार होते. मात्र, आता सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. १ तास मतदानाची वेळ वाढवली आहे.

Web Title: Belgaum One Lakh 40 Voters Exercise Their Right

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top