बेळगाव : गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणातील चौघांची निर्दोष सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Court

खुनाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात चौघांची निर्दोष सुटका ११ वे जिल्हा सत्र न्यायालयात नुकताच झाली आहे.

बेळगाव : गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणातील चौघांची निर्दोष सुटका

बेळगाव - खुनाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात चौघांची निर्दोष सुटका ११ वे जिल्हा सत्र न्यायालयात नुकताच झाली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये खानापूर तालुक्यातील माणिकवाडी क्रॉसला बंदुकीच्या गोळीने हल्ला करून खून करण्यात आल्याचा आरोप होता. पण, सबळ पुराव्याअभावी व साक्षिदारांतील विसंगतीमुळे आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

महांतेश शिरोले (रा. काडापूर, ता. चिक्कोडी) असे मयताचे नाव आहे. तर नंदकुमार चिदानंद शिरोले (वय २७), उदय केदारी शिरोले (२१, दोघे रा. काडापूर, ता: चिक्कोडी), मलिकार्जुन निंगाप्पा होसूर (२९), मंजुनाथ ईराप्पा कोटगी (२९, दोघे रा. दसनाळ, ताः सौंदती) अशी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. खानापूर तालुक्यातील माणिकवाडी क्रासला अनोळखी मृतदेह ऑक्टोबर २०१५ मध्ये मिळाले होते. याबाबतची फिर्याद सूरज हालगेकर यांनी खानापुर पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. यानुसार खून व बेकायदा पिस्तूल बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. तर अनोळखी मृतदेहावर स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे अंत्यक्रिया करण्यात आली.

आरोपी नंदकुमारचा भाऊ मयत महांतेश शिरोले यांना दारूचे व्यसन होते. नशेत लोकांना शिवीगाळ, मारहाण, वाद काढणे, घरात ब्लेडने हल्ला केल्यामुळे घरचे लोक कंटाळलेले होते. यामुळे नंदकुमारने भावाचा काटा काढण्याचे ठरविले. उत्तरप्रदेशहून बेकायदा पिस्तूल खरेदी केली व घरात ठेवली. तर १७ ऑक्टोबर २०१५ रोजी नंदकुमार याने महांतेश यांना गोव्यात कार्यक्रमाला जायाचे आहे, असे सांगून कारमधून घेऊन निघाले.

खानापूरला जेवन करुन मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास खानापूर-लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रासला गाडी थांबवली. महांतेश लघुशंकेला खाली आल्यानंतर नंदकुमारने गावठी पिस्तुलद्वारे गोळी झाडली. गळा व पाठीवर गोळी लागल्याने महांतेश खाली कोसळले. त्यानंतर इतरांनी परत महांतेशला मारबडव केली. यानंतर तेथून निघून गेले. खानापूर पोलिस ठाण्यात त्याची नोंद झाली. तपासात चौघांवर गुन्हा दाखल झाला. अकरावे जिल्हा व सत्र न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांच्यापुढे दाव्याची सुनावणी झाली. साक्षिदारांतील विसंगतीमुळे संशयितांची निर्दोष सुटका झाली. सरकार पक्षातर्फे तीस जणांची साक्ष, ६४ कागदपत्रे व २२ मुद्देमाल तपासण्यात आले होते. मात्र, सबळ पुरावा आणि साक्षिदारांतील विसंगतीमुळे संशयितांची निर्दोष मुक्तता झाली आहे. संशयित आरोपीतर्फे अॅड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

Web Title: Belgaum Release Of Four Accused In Shooting Murder Case Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..