बेळगाव : भरधाव क्रुझर नाल्यात कोसळून 8 ठार

क्रूजरमध्ये एकूण अठरा हजर होते
बेळगाव : भरधाव क्रुझर नाल्यात कोसळून 8 ठार
Updated on

बेळगाव : भरधाव क्रुझर वाहनाची पुलाच्या कठड्याला धडक बसून वाहन बळ्ळारी नाल्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाजण गंभीर जखमी झालेत. रविवार (ता.२६) सकाळी बेळगाव तालुक्यातील खणगाव गावाजवळ कल्याळ ब्रिजवर ही दुर्घटना घडली आहे. सर्व मृत गोकाक तालुक्यातील अक्कतंगीनहाळ, मुसलमरी मल्लापूर आणि दासनहट्टी गावातील राहणारे आहेत.

रोजदांरी कामगराना घेऊन बेळगाकडे येणाऱ्या भरधाव क्रुझर वाहनावरील चाककाचे नियत्रंण सुटल्याने खणगाव जवळील कल्याळ ब्रिजच्या कठड्याला धडक बसली. त्यानंतर क्रुझर सरळ जाऊन बळ्ळारी नाल्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर अकरा जण गंभीर जखमी झाले. क्रूजरमध्ये एकूण अठरा हजार होते. आडव्याप्पा चिलभावी (वय ४५), बसवराज दळवी (वय ३३) बसनगौडा हनुमाण्णावर (वय ४८), आकाश गस्ती (वय ३१), फकिरप्पा हरिजन (वय ५५ सर्वजण रा.अक्कतंगीनहाळ) मल्लप्पा सनदी (वय ४०, रा. दासनहट्टी), आणि कृष्णा रामाप्पा खंडोर (वय ३६, रा. दासनहट्टी) ठार झालेल्यांची नावे आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोलिंगय्या, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी भेट देऊन पाहणी केली. मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच मयतांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी बेळगावला धाव घेतली असून त्यांनी एकच आक्रोश केला. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com