esakal | बेळगाव-शेडबाळ-बेळगाव पॅसेंजर चौथ्यांदा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Passenger

बेळगाव-शेडबाळ-बेळगाव पॅसेंजर चौथ्यांदा रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव-शेडबाळ-बेळगाव दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे गेल्या दिड महिन्यात चौथ्यांदा रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे बुधवारपासून (१३) शनिवारपर्यंत (ता.१६) धावणार नसल्याने प्रवाशांतून नाराजी दिसून येत आहे. बेळगावात सुरु असलेल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामामुळे ही रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

बेळगाव ते शेडबाळ दरम्यान धावणारी ही पॅसेंजर रेल्वे ३० ऑगस्टपासून बंद होती. त्यानंतर १३ सप्टेंबरला ही रेल्वे सुरु केली जाणार होती. मात्र, पुन्हा पत्रक काढून १३ ते १६ सप्टेंबरपर्यंत ही रेल्वे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे सुरु करण्यात आली. मात्र, पुन्हा कामात अडथळा येत असल्याने २९ पासून १२ ऑक्टोबरपर्यंत ही रेल्वे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर सुरु करण्याचे रेल्वेने सांगितले होते. मात्र, पुन्हा १६ ऑक्टोबरपर्यंत ही रेल्वे बंद असल्याचे एक पत्रक नैर्ऋत्य रेल्वेने काढले आहे. सध्या या मार्गावर धावणारी ही एकच पॅसेंजर होती. तीसुद्धा आता बंद झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

loading image
go to top