बेळगाव : २५ पासून तीन पॅसेंजर रेल्वे धावणार

अनेक प्रवाशांना होणार लाभ : मिरज ते लोंढा, हुबळी ते मिरज व मिरज ते कॅसरलॉक मार्ग
Belgaum Three passenger trains from 25 Miraj Londha Hubli Kaserlock routes
Belgaum Three passenger trains from 25 Miraj Londha Hubli Kaserlock routesSakal
Updated on

बेळगाव : नैर्ऋत्य रेल्वेअंतर्गत मिरज ते लोंढा, हुबळी ते मिरज व मिरज ते कॅसरलॉक या दरम्यान गुरुवार (ता.२५), शुक्रवार (ता.२६) व शनिवारपासून (ता.२७) तीन पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. या पॅसेंजर रेल्वे असल्याने अनेकांना याचा लाभ घेता येणार आहे. कोरोनामुळे या रेल्वे बंद होत्या. मात्र, आता पुन्हा धावणार असल्याने हुबळी, बेळगाव व मिरजमधील अनेक प्रवाशांना ये-जा करण्यास सोपे झाले आहे.

मिरज-लोंढा-मिरज ०७३५१ व ०७३५२ ही रेल्वे धावेल. मिरजहून २५ ऑगस्‍ट तर लोंढाहून २६ ऑगस्टपासून या रेल्वे धावतील. ०७३५१ ही मिरजहून ०७.१० वाजता निघून बेळगावला रात्री १०.०५ वाजता पोहचेल. तसेच लोंढा येथे रात्री ११.५५ मिनीटांनी पोहचेल. लोंढाहून रोज सकाळी ५ वाजता निघून ६ वाजून १० मिनीटांनी बेळगाव तर ९.४५ वाजता मिरजला पोहचेल.

मिरज कॅसरलॉक मिरज दरम्यान १७३३३ व १७३३४ या क्रमांकाच्या रेल्वे धावतील. ही रेल्वे दोन्ही बाजूने २६ पासून धावणार आहे. रेल्वे मिरजहून सुधारित वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता (सकाळी १०:१५ ऐवजी) सुटेल. दुपारी १.२५ वाजता बेळगाव तर ४.३० वाजता कॅसरलॉकला पोहचेल. कॅसरलॉकहून सायंकाळी ५ वाजता निघून ७.१० वाजता बेळगाव तर ८.४० वाजता मिरजला पोहचेल. हुबळी-मिरज-हुबळी दरम्यान १७३३२ व १७३३१ ही रेल्वे धावेल. हुबळीहून २७ तर मिरजहून २७ ऑगस्टपासून ही रेल्वे धावेल. हुबळीहून सकाळी १०.३० वाजता निघून दुपारी २.४० वाजता बेळगाव व सायंकाळी ६.३० वाजता मिरजला पोहचेल. मिरजहून सकाळी ६.१० वाजता निघून ९.४५ ला बेळगाव तर दुपारी ३ वाजता हुबलीला पोहचेल.

या तीन पॅसेंजर रेल्वे २५ ऑगस्टपासून पुन्हा रुळावरून धावणार असल्याने बेळगाव-शेडबाळ-बेळगाव बंद होणार आहे. ही रेल्वे २६ पासून दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा निर्णय नैर्ऋत्य रेल्वेने घेतला आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासून हुबळी-मिरज मार्गावरील पॅसेंजर सेवा बंद होती. प्रवाशांच्या मागणीनंतर शेडबाळ-बेळगाव-शेडबाळ अशी रेल्वे सेवा सुरु केली. मात्र, ही रेल्वे बंद करून त्या तीन रेल्वे धावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
why milk collection is falling in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com