
Belgaum : कोगनोळीत `बर्निंग ट्रक`चा थरार
कोगनोळी: राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशर ट्रकला आग लागल्याची घटना रविवारी (ता. 13) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. `बर्निंग ट्रक`चा थरार यावेळी अनुभवायला मिळाला. आगीत वाहन जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. आगीचे उग्र रूप पाहून पोलिसांनी अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता.
हेही वाचा: कोगनोळी जवळील अपघातात अंकलीतील एकाचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून बंगळूरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन कोगनोळी फाट्यावर असणाऱ्या सेवा रस्त्यावर आणून सर्व्हिंसिंग सेंटरमधील पाण्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. चालक व अन्य नागरिकांनी जळत असलेले वाहन सोडून लांब थांबले. रौद्ररूप धारण करुन ट्रकला चार बाजूने मोठी आग लागली.
हेही वाचा: बेळगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी नाक्यावर कडक बंदोबस्त
कागल नगरपालिका व निपाणी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पण आयशर ट्रक व त्यामध्ये असणारे कपडे जळून खाक झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महामार्गावर अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. कोगनोळी उपठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी नागरिकांना लांब थांबवण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. घटनास्थळी पंचक्रोशीसह महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Web Title: Belgaum Vibration Burning Truck Corner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..