धक्कादायक ; येथे कामगारांना मिळत नाही पिण्याचे पाणी  

Belgaum workers have no drinking water
Belgaum workers have no drinking water
Updated on

बेळगाव - उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. अशा रखरखत्या उन्हातच रोहयो कामगारांना काम करावे लागत आहे. अशा स्थितीत काम सुरु असलेल्या ठिकाणी कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्‍यक आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींनी अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. त्यामुळे, कामगारांना घरुन नेलेल्या पाण्यावरच दिवस काढावा लागत आहे. ग्रामपंचायतींनी कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

बेळगाव तालुक्‍यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात रोहयो कामे सुरू आहेत. बेळगाव तालुक्‍यातील सुमारे आठ हजार रोहयो कामगार कार्यरत आहेत. मात्र, या कामगारांना सुविधा पुरविण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी रोहयो कामगारांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा अधिक वाढतात. यंदा फेब्रुवारीतच तापमान 35 अंशावर पोचले आहे. त्यामुळे, उष्मा वाढला असून रणरणत्या उन्हातच कामगार काम करत आहेत. त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. 

केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे रोहयो कामगारांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे अनिवार्य आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीच्या पीडीओंकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, रोहयो कामगारांची गैरसोय होत आहे. तसेच उन्हाळ्यात रोहयो कामगारांना केंद्र सरकारकडून वाढीव मजुरी दिली जाते. पण, यंदा उन्हाळा आला तरी शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी 50 रुपये अधिक मजुरी दिली जाते. पण, त्यांना 175 रुपयांवरच काम करावे लागत आहे. या मजुरीतही नियमाप्रमाणे वाढ करावी. तसेच उन्हाळ्यात लागू करण्यात येणारा विशेष भत्ताही द्यावी, अशी मागणी रोहयो कामगारांतून केली जात आहे. 

हे पण वाचा - ‘काय पावणं, कुठं चाललाय...? 
 
आगामी काळात उष्म्यात अधिक वाढ होणार आहे. तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात रोहयो कामगारांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहे. याबाबत पीडीओंना सूचना करण्यात येतील. मात्र, विशेष भत्ता हा शासनाकडून दिला जातो. अद्याप शासनाकडून कोणतेच आदेश आलेला नाही. आदेश आल्यानंतर त्यानुसार वेतनात वाढ केली जाणार आहे. 
- एम. के. कलादगी, कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is Property Card in Maharashtra?
Muslim Gorakshak Dal in Miraj
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Sangli Accident News Konkan tourism
Marathi News Esakal
www.esakal.com