esakal | बेळगाव : डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या

बेळगावात 13 वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने नेहरूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार (ता.५) कसाई गल्ली येथे मोरारजी देसाई वस्ती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत नापास झालेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने घेऊन आत्महत्या केली आहे. शाहिद खालेखान शेख (वय १३) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मार्केट पोलिसांत झाली आहे.

हेही वाचा: WhatsApp, Facebook, Insta का झालं ठप्प? ते प्रियांका गांधींवर गुन्हा

परीक्षेला सामोरे जाणे अवघड जात आहे तसेच महाविद्यालयाचे शुल्क भरणे शक्य नसल्यास चिट्ठी लिहून इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने नेहरूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार (ता.४) घडली होती. त्यानंतर आज कसाई गल्लीमध्ये सहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाहीर हा इयत्ता सहावी मध्ये शिकत होता.

मोरारजी देसाई वस्ती शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या परीक्षेत तो नापास झाला होता. तसेच पालकांनी त्याला अभ्यास कर असे सांगितल्याने आज सकाळी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येतात पालकांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन तुळसीगेरी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. खालीखान यांना तीन मुले असून शाहिदा मोठा मुलगा होता. जिल्हा रुग्णालयातील शवाआगारात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top