esakal | भौगोलिक मानांकनात बेदाणा, हळद पिकांना फायदा ICrops
sakal

बोलून बातमी शोधा

हळद

भौगोलिक मानांकनात बेदाणा, हळद पिकांना फायदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली ः देशातील प्रत्येक राज्यात आता भौगोलिक मानांकन केलेल्या शेतीमालांची दुकाने सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे सांगलीतील मिळालेल्या बेदाणा आणि हळद पिकांना याचा विक्रीसाठी मोठा फायदा होईल. सहाजिकच उत्पन्नात वाढ होईल. सध्या दर्जेदार उत्पादन घेण्यात आता शेतकरी माहिर झाला आहे. आता जागातील बाजारपेठेत बेदाणा, हळदचे ब्रॅडिंग करुन विक्रीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत कृषी निर्यातक्षम कक्षाचे तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: अमरिंदर सिंग पोहोचले शहांच्या घरी; महत्वाच्या घडामोडी शक्यता

बेदाणा परिषद व भौगोलिक मानांकन अधिकृत वापरकर्ता कार्यशाळेत ते बोलत होते. पणनचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कृषीअधिक्षक मनोजकुमार वेताळ, द्राक्ष संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, वर्षा बायोचे एन. बी. म्हेत्रे, सत्यवान वराळे, संपतराव नलवडे उपस्थित होते.श्री. हांडे म्हणाले, सांगलीतील बेदाणा, हळदीला भौगोलिक मानांकान मिळाले आहे. आता शेतकऱ्यांनी त्या संस्थेकडे वापरकर्ता म्हणून नोंदणी केली पाहिजे. माल विक्रीसाठी ब्रॅडिंग, पॅकिंग आणि विक्रीची साखळी उभी करणे सोपे जाईल. स्पर्धेत टिकण्यास,ठी मानांकनाच्या निकषानुसार उत्पादन घेणे महत्वाचे आहे. भविष्यात ब्रॅंडिगद्वारेच बेदाणा,हळद विकली पाहिजे. शेती पिकांचे भौगोलिक मानांकनासाठी राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

सुभाष घुले म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात सांगलीचा बेदाणा, हळद अधोरेखित होणे गरचेचे आहे. सुभाष आर्वे, एन. बी. म्हेत्रे, सत्यवान वराळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. वेताळ यांनी प्रास्ताविक व उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी आभार मानले.


* देशात बेदाणा उत्पादनात सांगलीचा समावेश

* राज्यातील बेदाणापैकी ८० टक्के उत्पादन सांगलीतून

* बेदाणा क्षेत्र -८ हजार ७०० हेक्टर

* दरवर्षी ८५ ते ९० हजार मेट्रीक टन बेदाणा उत्पादन

* पैकी २० टक्क्यापर्यंत बेदाण्याची निर्यात

* बेदाणा जी.आय. मानांकनांर्गत १८६ शेतकऱ्यांनी नोंदणी

loading image
go to top