बाबासाहेब देशमुख बँकेला उत्कृष्ट नागरी पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या पुरस्काराने आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बँकेचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. 

आटपाडी  (जि. सांगली) - येथील बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या पुरस्काराने आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बँकेचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. 

हे पण वाचा -  ...तर मुली पुढाकार कधी घेणार? 

ग्रामीण आणि दुष्काळी भागात कार्यरत असलेल्या या बँकेच्या २४ वर्षाच्या कारकिर्दीतील हा माणाचा एकोणिसावा पुरस्कार आहे. देशमुख सहकारी बँकेच्या स्थापनेला २४ वर्षे झाली आहेत. दुष्काळी ग्रामीण भागात खडतर परिस्थितीत कार्यरत असतानाही बँकेची कामगिरी आणि वाटचाल राज्य पातळीवर शासन, प्रशासन आणि विविध संस्थांना दखल घेण्यासारखी केली आहे. अत्यंत प्रभावी आणि लक्षवेधी अशी बँकेची कामगिरी असून तिने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सध्या दहा संस्थात बँकेच्या २५८ ठेवी झाल्या असून ५०० कोटी व्यवसायाकडे वाटतात सुरू आहे. बँकेला महाराष्ट्र राज्य सरकार बँक्स असोसिएशनने उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत पुणे विभागात शंभर ते पाचशे कोटी ठेवी असणाऱ्या बँकांमधून २०१८-१९ सालासाठी 'पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक'म्हणून निवड जाहीर केली होती. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबई येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष दादासाहेब पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी भगवंत आडमुठे उस्थित होते. 

हे पण वाचा - धक्कादायक- मुलांना  मारण्याची धमकी देत केला बलात्कार 

बँकेच्या ग्राहक, सभासद, कर्मचारी, संचालक यांच्या सर्वांच्या योगदानामुळे आणि कामगिरीमुळे बँकेला अभिमानास्पद मानाचा पुरस्कार मिळाला आहे. यात सर्वांचा वाटा आहे. -अमरसिंह देशमुख.  (संस्थापक अध्यक्ष-दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँक आटपाडी.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Citizen Award for Baba Saheb Deshmukh Bank