धक्कादायक- मुलांना मारण्याची धमकी देत केला बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

गहाणवट ठेवण्यास दिलेले महिलेचे गंठण परत मागताच महिलेच्या मुलीलाही संशयितांने घरात घुसून तिचा हात....

गांधीनगर (कोल्हापूर) ः  घरात घुसून महिलेला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे घडली आहे. याबाबत विकास पोवार (गडमुडशिंगी) याच्यावर गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जानेवारी 2018 मध्ये पोवार याने रात्रीच्या वेळी पीडित महिलेच्या घरात घुसून तिचे तोंड दाबून तसेच तिला आणि तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी घरात तसेच सांगली फाटा येथील एका लॉजवर घेऊन जाऊन बलात्कार केला.

हेही वाचा- पंधरा हजार नागरिकांनी अनुभवले हे ४२ चित्ररथ...

मला काय विचारतोस

दरम्यान, पोवार याने स्वतःच्या गरजेपोटी महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण घेऊन ते गहाणवट ठेवले होते. ते 27 जानेवारीला परत मागितले असता, "कुठले गंठण, मला काय विचारतेस' असे दरडावत तिला शिवीगाळ केली. या वेळी महिलेच्या मुलीने आईला शिव्या का देतोस अशी विचारणा करताच घरात घुसून मुलगीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर महिलेने हा प्रकार आपल्या भावांना सांगितला. त्या वेळी ते सर्वजण गडमुडशिंगी येथे येऊन आरोपीस विचारणा करीत असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली. पीडित महिलेने याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मलमे करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens case in Gadmudshingi Kolhapur marathi news